Our Ujjain Omkareshwar tour takes you on a spiritual quest through two of the most revered destinations in India. From the ancient temples of Ujjain to the tranquil vibes of Omkareshwar, this tour offers a unique blend of history, culture, and spirituality. Discover the rich heritage, sacred rituals, and breathtaking landscapes that define these sacred places. Immerse yourself in the divine energy and find inner peace on this soul-stirring journey.
टूर शेड्युल:
दिवस ० : पुणे ते इंदौर – रात्रभर प्रवास
संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमून पुण्याहून ए.सी. बसने इंदोरकडे प्रस्थान. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील रम्य निसर्गरम्य मार्गाने प्रवास करत पवित्र दर्शन यात्रेची सुरुवात.
जेवण: कोणतेही जेवण नाही
दिवस १ : उज्जैन – महाकाळेश्वर व कालभैरवनाथ दर्शन
सकाळी इंदोर येथे आगमन झाल्यावर हॉटेलमध्ये फ्रेश होऊन नाश्ता करावा. त्यानंतर . पवित्र क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेले हे प्राचीन मंदिर नगरी आहे. येथे श्री महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग, हरसिद्धी माता मंदिर आणि कालभैरवनाथ मंदिराचे दर्शन घ्यावे. रात्री क्षिप्रा आरती करून जेवणानंतर इंदोर मध्ये हॉटेल्स मुक्काम.
जेवण: सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचे आणि रात्रीचे जेवण
दिवस २ : ओंकारेश्वर व ममलेश्वर दर्शन
नाश्त्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रयाण. नर्मदा नदीच्या तीरावर वसलेले हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र स्थळ आहे. दर्शनानंतर नदीपलीकडे असलेल्या ममलेश्वर मंदिरास भेट. पुण्याकडे परतीचा प्रवास ए.सी. बसने सुरू होईल. रात्री बसमधून प्रवास.
जेवण: सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचे आणि रात्रीचे जेवण
दिवस ३ : पुण्यात आगमन
पहाटे पुण्यात आगमन. देवदर्शनातून मिळालेल्या दिव्य अनुभवांसह आणि सुंदर आठवणींसह यात्रेची सांगता.
जेवण: कोणतेही जेवण नाही