पारंपारिक आयुर्वेदाला आधुनिकतेची साथ कांस्य थाळी
कांस्या थाळी पायाची मसाज -
कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये “पादाभ्यंग” सांगितलेले आहे त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी. भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे “कांस्यम बुद्धीवर्धकम”
आपल्या मराठीत एक म्हण आहे ” तळपायाची आग मस्तकात जाणे” आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते.
वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात.